भाजप नगरसेवक शिरीष पाटील आणि समाजसेविका निशा पाटील यांच्या माध्यमातून कोपरखैरणे येथे श्री प्रतिष्ठानच्यावतीने “गुणवंतांचा सत्कार व सन्मान” सोहळ्याचे आयोजण  करण्यात आले  

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सुजाता पाटील व माजी खासदार संजीव नाईक हे उपस्थित होते .तसेच यावेळी व्यासपीठावर पाणीपुरवठा विभाग सभापती रविकांत पाटील, नगरसेविका मिनाक्षी पाटील, नगरसेविका चंद्रभागा मोरे , नगरसेवक डी. आर. पाटील, परिवहन समिती सदस्या तीर्था सकपाळ, समाजसेवक शरद पाटील, कोपरखैरणे गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रभाग क्रमांक – ११ मधील शैक्षणिक वर्ष – २०२६ मध्ये इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या  तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्ती आणि सेवापूर्ती सत्कारार्थींचा यथोचित सन्मान करून त्यांच्या समाजाभिमुख योगदानाचा गौरव करण्यात आला.
शिरीष पाटील यांच्या नेतृत्वातून गेल्या १९ वर्षांपासून अविरत सुरू असलेला हा गौरव सोहळा केवळ एक कौतुक सोहळा नसून, समाजातील नव्या प्रतिभावंतांना ऊर्जा देणारा एक ऊर्जास्रोत ठरत आहे.  उपस्थित मान्यवरांनी शिरीष पाटील यांच्या या सातत्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत, ‘या व्यासपीठामुळे शेकडो प्रतिभावंतांच्या पंखांना नवे बळ मिळाले असून, ही ऊर्जा त्यांना आयुष्यात मोठी झेप घेण्यासाठी कायम मार्गदर्शक ठरेल’, असा विश्वास व्यक्त केला आणि या स्तुत्य कार्यास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक व नगरसेवक शिरीष पाटील यांनी “गुणवंतांचा सत्कार व सन्मान” सोहळ्यामागील उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले की,  गेल्या १९ वर्षांत या मंचावरून सन्मानित झालेल्या शेकडो गुणवंतांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत यश संपादन केले आहे, हेच या उपक्रमाचे खरे यश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *