कर्करोगाची दिवसेंदिवस वाढती रूग्णसंख्या विचारात घेता त्याचे अचूक निदान झाल्यास आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यास प्राण वाचण्यास मदत होते. रुग्णांना जवळच्या रुग्णालयात माफक, अचूक निदान तसेच अत्याधुनिक उपचार उपलब्ध होईल यादृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील आहे, पुणे विभागातील कर्करोग रुग्णालयाच्या कामाला तातडीने गती देण्यात येईल. देशात कर्करोगाचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत असून त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी अचूक निदान आणि योग्यप्रकारे उपचार महत्त्वाचे आहे. उपचार उशिरा सुरु झाल्यास रुग्णांचा वेळ आणि खर्चात वाढ होते; याच बाबीचा विचार करुन केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेमध्ये कर्करोगावरील उपचाराचा समावेश केलेला आहे. इंद्रायणी रुग्णालयाने व्यवसायिक दृष्टिकोन न ठेवता नेहमीच रुग्णांना माफक दरात आरोग्यसेवेला प्राधान्य दिले आहे. हे कार्य सामजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे, यापुढेही अशीच निरंतर रुग्णसेवा होत राहील, अशी अपेक्षा आहे – उपमुख्यमंत्री श्रीमती पवार
यावेळी आमदार दिलीप वळसे-पाटील, बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद पुणेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन देवमाने, आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे पेटसिटी युनिटचे लोकार्पण करण्यात आले.












Leave a Reply