महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणकाधारित कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणकाधारित कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयामध्ये त्यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सीबीटी पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल तसेच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर व परीक्षा नियंत्रक सरिता बांदेकर – देशमुख उपस्थित होते

अध्यक्ष भीमनवार यांनी दिलेली माहिती अशी 👇🏾
🖥️ परीक्षांतील विलंब कमी करून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आयोगाकडून व्यापक सुधारणा सुरू
🖥️ पूर्व परीक्षांचे निकाल २१ दिवसांत जाहीर करण्याचे नियोजन. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अवघ्या २२ दिवसांत प्रसिद्ध
🖥️ ज्या वर्षी परीक्षा होईल, त्याच वर्षात तिची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित
🖥️ मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया ९ ते ११ महिन्यांत, तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया ६ ते ७ महिन्यांत पूर्ण केली जाईल
🖥️ सीबीटी पद्धतीचा निर्णय केवळ पूर्व परीक्षांसाठी लागू. राज्यसेवा, गट ‘अ’, गट ‘ब’, किवा गट ‘क’ च्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात यंदा कोणताही बदल नाही
🖥️ लोकसेवा आयोगाकडून आतापर्यंत सुमारे १४० परीक्षा सीबीटी प्रणालीनुसार. सीबीटी प्रणाली वैज्ञानिक, न्यायालयाने मान्यता दिलेली आणि देशभरात स्वीकारलेली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *