नवी मुंबईत ‘महाराष्ट्र एमएसएमई शिखर परिषद व पुरस्कार २०२६’ चा दिमाखात शुभारंभ !

जागतिक एमएसएमई दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळातर्फे नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये “महाराष्ट्र एमएसएमई शिखर परिषद व पुरस्कार २०२६” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

“संकल्प ते सिद्धी” या संकल्पनेवर आयोजित महाराष्ट्र एमएसएमई शिखर परिषदेच्या मागील मुख्य उद्देश होता.. राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे आणि महाराष्ट्राला १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्यात एमएसएमई च्या भूमिकेला सक्षम करणे.

या परिषेदत राज्यभरातून २,००० हून अधिक उद्योजक, धोरणकर्ते, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ एकत्र आले होते . या परिषदेत निर्यातवृद्धी, अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल परिवर्तन, शाश्वत विकास आणि महिला उद्योजकता या महत्त्वाच्या विषयांवर सखोल विचारमंथन केले गेले .
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या ‘महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित’ ( तर्फे आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योगांचा गौरव करण्यात आला तसेच महाराष्ट्र एमएसएमई पुरस्कार २०२६” द्वारे राज्यातील उत्कृष्ट उद्योजकता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उद्योग क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यात आला .

यावेळी उपस्थितांनी बोलताना, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले कि , महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात आणि रोजगाराच्या निर्मितीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे योगदान अतुलनीय आहे. या क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी याकडे हि जोर दिला कि , नवीन पिढीने नोकरी मागण्यापेक्षा ‘नोकरी देणारे’ बनावे. कारण नवउद्योजकांच्या कल्पकतेला बाजारपेठ मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी महायुती सरकार सक्षम आहे. तसेच त्यांनी हि देखील माहिती दिली , यामध्ये महिला उद्योजकांचा सहभाग वाढावा यासाठी शासन विशेष सवलती आणि आर्थिक साहाय्य देत आहे.

याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते . तसेच यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अनबलगन, विकास आयुक्त श्रीमती कादंबरी बलकवडे, जॉईन्ट सीईओ डॉ. कुणाल खेमनार, सचिव गोपाळ पुंगुलवार, पद्मश्री मिलिंद कांबळे आणि एमएसएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विकास पानसरे व इतर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *