‘ॐ सर्वमंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्रयम्बके, गौरी नारायणी नमोस्तुते।।’ या शक्तिशाली मंत्राच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात नरात्रोत्सवाच्या उत्साहात नवी मुंबईतील वाशी येथे महात्मा गांधी कॉम्प्लेक्स, वॉर्ड क्रमांक ५८ब, सेकटर १४-१५ येथे असलेल्या सोमेश्वर को-ऑप हौसिंग सोसायटी आणि सोमेश्वर शिवमंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “वाशीची अंबेमाते”चा नयनरम्य आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.
‘वाशीची अंबेमाता’ हिने सोन्याच्या पावलांनी आपल्या भक्तांच्या भेटीला येताना, या वर्षी एक वेगळंच आणि विलोभनीय रूप धारण केलं होतं. मातेच्या आगमनामुळे संपूर्ण परिसरात एक चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होते .यंदाच्या मूर्तीचं खास आकर्षण म्हणजे ‘शिवलिंग आणि डमरूवर विराजमान मातेचं’ विलोभनीय रूप. .. शिवा आणि शक्तीच्या एकाच रूपात दर्शन देणारी ‘वाशीची अंबेमातेची मूर्ती भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरली.
या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्जा , चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक वाद्यवृंदाचा निनाद, ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक वेशभूषा यामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते . हा आगमन सोहळा खऱ्या अर्थाने श्रद्धा आणि संस्कृतीचा मिलाफ दर्शवणारा ठरला.
याप्रसंगी मंडळाचे आधारस्तंभ माजी नगरसेवक प्रकाश मोरे , माजी नगरसेविका शिल्पा मोरे यांच्यासह महिला – पुरुष पदाधिकारी , जेष्ठ नागरिक , तरुण – तरुणी मोठया संख्येने सहभागी झाले होते .















Leave a Reply