सानपाडा येथील पामबीच (सोनखार) सेक्टर-16 परिसरात दोन अल्पवयीन मुलींशी छेडछाड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्टेशनरी दुकानातून साहित्य घेण्यासाठी गेलेल्या मुलींना गुनिना मैदानाजवळ एका ५० वर्षीय व्यक्तीने छेडछाड केल्याचे समोर आले असून, परिसरातील सतर्क महिलांनी तात्काळ हस्तक्षेप करत ‘डायल 112’ वर पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या सानपाडा पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
या घटनेनंतर परिसरातील महिला व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक महिलांचा आरोप आहे की सेक्टर-16 या रहिवासी परिसरात सुरू असलेल्या वाइन शॉपमुळे असामाजिक तत्वांचा वावर वाढला असून, सार्वजनिक ठिकाणी उघडपणे मद्यपान होत असल्याने महिलां व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सायंकाळच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाल्याचेही नागरिकांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी वाइन शॉप तत्काळ हटविणे, परिसरात पोलिस गस्त वाढविणे तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.












Leave a Reply