सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, शिरवणे यंदा आपल्या स्थापनेचं चाळीसावं (४० वे) गौरवशाली वर्ष मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरं करत आहे. १९८६ साली शिरवणेचे माजी सरपंच कै. अरुण परशुराम सुतार यांच्या दूरदृष्टी आणि प्रेरणेतून सुरू झालेला हा ऐतिहासिक उत्सव, गेली ४० वर्षे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या कणखर नेतृत्वाखाली धार्मिक आणि सामाजिक परंपरा अविरतपणे जपत आहे. समाजसेवक जयेंद्र सुतार, माजी नगरसेविका माधुरी सुतार, महिला संघटक निर्मला सुतार यांच्यासह ज्येष्ठ मंडळी आणि निःस्वार्थ सेवाभाव जपणारे कार्यकर्ते यांच्या समर्पित भावनेमुळे, मंडळाने केवळ देवी मातेची आराधनाच नव्हे, तर अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीरित्या राबवून सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला आहे. मंडळाच्या या चाळीस वर्षांच्या वाटचालीने त्यांच्या कार्याची उज्ज्वल उंची दर्शविली आहे.
यंदाच्या नवरात्रोत्सवात मंडळाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला एक वेगळीच झळाळी दिली आहे. नारीशक्तीचं प्रतीक असलेल्या या भक्तिमय पर्वात, उत्सवाच्या सहाव्या दिवशी महिलांसाठी आयोजित केलेल्या खास हळदी-कुंकू समारंभाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.याप्रसंगी माजी महापौर जयवंत , समाजसेवक जयेंद्र सुतार , माजी नगरसेविका माधुरी सुतार , महिला संघटक निर्मला सुतार यांच्यासह मीनाक्षी हिलाल , वार्ड अध्यक्षा अरुणा भोईर , मंडळाच्या उपाध्यक्षा वर्षां पवार तसेच मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
तर याप्रसंगी मंडळाच्या वतीने आमंत्रित माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेविका स्नेहा पालकर ,माजी नगरसेविका तनुजा मढवी या महिला लोकप्रतिनिधी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या,
याप्रसंगी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करून कार्यक्रमाला सामाजिक जाणीवेची जोड देण्यात आली. विशेष म्हणजे, यावेळी आयोजित केलेल्या लकी ड्रा मधील ९ विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले आणि लहान मुलांसाठीच्या नृत्य स्पर्धेतील स्पर्धकांनाही उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. अशा प्रकारे, चाळीसाव्या वर्षाचा हा नवरात्रोत्सव सर्वांसाठीच एक अविस्मरणीय पर्वणी ठरत आहे.














Leave a Reply