दरवर्षीप्रमाणे या वर्षीही, नाखवा सिताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाने गणेशोत्सवात एका वेगळ्या संकल्पनेतून सामाजिक संदेश दिला आहे. श्री. बुद्धेश्वर शिव मंदिर, सेक्टर १४, सानपाडा – पाम बीच येथे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भगत आणि युवा नेते निशांत भगत यांच्या नेतृत्वाखाली, यावर्षी मंडळाच्यावतीने बाप्पाच्या दरबाराला ‘पुस्तकांचे गाव’ या थीमवर सजवण्यात आले होते हे मंडळ आपल्या या नाविन्यपूर्ण आणि सामाजिक संदेश देणाऱ्या थीममुळे सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
सालाबादप्रमाणे यंदा देखील मंडळाच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजेचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी मोठया संख्येने नागरिकांनी व विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांनी श्रीदर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला . याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत , माजी नगरसेविका वैजयंती भगत , युवा नेते निशांत भगत , संदीप भगत यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .
दर्शकांना सांग इच्छितो कि , सातारा जिल्ह्यातील भिलार गावाच्या ‘पुस्तकांचे गाव’ या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन मंडळाने ही अनोखी सजावट केली होती याचा मुख्य उद्देश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा आहे. या उपक्रमामुळे ‘मोबाईलशी नाही, तर पुस्तकांशी मैत्री’ हा संदेश समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला .
या आकर्षक सजावटीबरोबरच, मंडळाने पेपर मॅश वापरून बनवलेली ‘सोनखारच्या राजा’ची मूर्तीसुद्धा विशेष लक्षवेधी ठरली . ही मूर्ती पर्यावरणाचा संदेश देणारी आणि या संपूर्ण सजावटीला एक वेगळाच स्पर्श देणारी होती .














Leave a Reply