नाशिक येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या वतीने “वृक्षारोपण संकल्पपूर्ती” या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या समारंभात राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गणेशजी नाईक यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.
२ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ या अवघ्या ३० दिवसांच्या कालावधीत या मोहिमेद्वारे तब्बल १,११,४२४ वृक्षारोपण करून एक विक्रम नोंदवण्यात आला. हजारो भाविक आणि स्वयंसेवकांनी एकत्र येत ही महान पर्यावरण मोहिम यशस्वी केली.
सोहळ्यादरम्यान, वनमंत्री गणेश नाईक आणि जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण मोहिमेत उल्लेखनीय सहभाग आणि योगदान देणाऱ्या अनुयायांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.
हा समारंभ श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक जबाबदारीची जाण जपत पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश या उपक्रमातून समाजात पोहोचल्याचेही दिसून आले.
कार्यक्रमाला जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, नाशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, नाशिक उपवनसंरक्षक (प्रादेशिक) सिद्धेश टी. सावर्डेकर, सामाजिक वनीकरण विभागाचे वनसंरक्षक गजेंद्र हिरे, सामाजिक वनीकरण — नाशिकचे विभागीय वन अधिकारी गणेश रणदिवे, तसेच जगद्गुरू महाराजांचे अनुगामी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Leave a Reply