शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित सार्वजनिक नवरात्री उत्सव – २०२५ मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी “वाशीची आई भवानी” मातेचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी खासदार नरेश मस्के , शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर , माजी नगरसेवक वैभव गायकवाड , माजी नगरसेविका दिव्या गायकवाड , यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते .
शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या नेतृत्वाखाली गेली ३५ वर्षे हा भव्य उत्सव वाशी सेक्टर ९ च्या मध्यभागी आयोजित केला जात आहे. “वाशीची आई भवानी” च्या या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे किशोर पाटकर यांच्या कल्पकतेतून साकारलेली भव्य आकर्षक रोषणाई. वाशीच्या मध्यभागी असलेल्या या उत्सवस्थळाच्या चारी बाजूनी करण्यात आलेली ही रोषणाई रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर लखलखीत करते, ज्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढत आहे.














Leave a Reply