Geeten Patil यांचा नारीशक्तीच्या उत्सवात “सेवा उपक्रम” – Nerul Panel-23- महिलांना केलंबा देवीचे दर्शन

नवरात्री हे नारीशक्तीचं प्रतीक असलेलं एक पवित्र आणि श्रद्धेचं पर्व आहे. याच भक्तिपूर्ण वातावरणात, नवी मुंबई युवासेना जिल्हा सरचिटणीस गीतेन पाटील यांनी नेरुळ पॅनल क्र. २३ मधील महिलांसाठी एक खास धार्मिक उपक्रम आयोजित केला.

नवसाला पावणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वयंभु केलंबा देवीच्या दर्शनाचा हा सोहळा उत्साहात पार पडला. गीतेन पाटील यांच्या या उपक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद देत, मोठ्या संख्येने त्या देवीच्या दर्शनासाठी सहभागी झाल्या होत्या. या यात्रेसाठी मोफत बस सेवा, अल्पोपहार आणि इतर सोयी-सुविधांची उत्कृष्ट व्यवस्था गीतेंन पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.

गेल्या काही काळात गीतेन पाटील यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. एक तरुण, सुशिक्षित आणि सक्रिय युवा समाजसेवक म्हणून ते सामाजिक आणि राजकीय दोन्ही क्षेत्रांत कार्य करत आहेत. अतिशय अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. समाजाशी असलेली नाळ आणि जनतेप्रतीची बांधिलकी त्यांनी अशा विविध उपक्रमांतून सिद्ध केली आहे.आणि त्याचाच एक भाग म्हणून नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा धार्मिक-सामाजिक उपक्रम त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाची आणि प्रभावी जनसंपर्काची आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष देतो.

याप्रसंगी उपस्थित महिलांनी गीतन पाटील यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाची प्रशंसा केली.

यावेळी गीतन पाटील यांनी आयोजनामागील आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “या उपक्रमाच्या मार्गात अनेक आव्हाने आली आणि तो थांबवण्याचा प्रयत्नही केला गेला.” मात्र, त्या साऱ्या अडचणींवर आणि प्रयत्नांवर मात करत आजचा हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाल्याचा आपल्याला केवळ आनंदच नाही, तर एक वेगळे समाधान मिळाले आहे.
गीतेन पाटील – सरचिटणीस ,नवी मुंबई युवासेना जिल्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *