युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा राज्याभिषेक दिन सोहळा

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा राज्याभिषेक दिन सोहळा (तिथीनुसार) दुर्गराज रायगडावर पारंपरिक उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून राज्य शासन कार्यरत असल्याचे सांगत रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी व्यासपीठावर रोहयो मंत्री भरत गोगावले, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *