प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त सहभागातून संकलित सिंगल यूज प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून तयार करण्यात आलेल्या गार्डन बेंचेसचे वितरण करण्यात आले. ‘स्वच्छ सवयींमधून स्वच्छ भारत’ या विशेष अभियानांतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना या बेंचेसचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक पिशव्या व सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबवून ‘थ्री आर’ (Reduce, Reuse, Recycle) संकल्पनेअंतर्गत प्लास्टिक संकलन, पुनर्प्रक्रिया व पुनर्वापरावर भर दिला जात आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे ४ टन प्लास्टिक संकलित करून त्याचा पुनर्वापर करण्यात आला असून ५१ शाळांचा सहभाग नोंदविण्यात आला आहे.
या उपक्रमात माइंडस्पेस रिट यांच्या सहकार्याने सातत्याने सहभागी असलेल्या शाळा, संस्था व कार्यालयांना पहिल्या टप्प्यात ३५ गार्डन बेंचेस देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या पुनर्प्रक्रियाकृत बेंचेस विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आकर्षक रंग व चित्रांनी सजविल्या असून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला आहे.














Leave a Reply