प्रभाग 18 मध्ये भाजपचा पॅनल विक्रम | प्रीती संदीप भगत, निशांत करसन भगत आणि दशरथ सीताराम भगत यांचा दणदणीत विजय

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मधून भारतीय जनता पार्टीने पॅनल पद्धतीत अभूतपूर्व यश मिळवत नवा राजकीय विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रभाग (अ) गटातील भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका प्रीती संदीप भगत यांनी पहिल्याच निवडणुकीत 12,474 मते मिळवत 10,261 मतांच्या फरकाने सर्वाधिक मताधिक्याचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला. महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधांवरील त्यांची स्पष्ट भूमिका मतदारांच्या पसंतीस उतरली.

त्याचप्रमाणे प्रभाग (ड) गटातील निशांत करसन भगत यांनी 11,358 मते मिळवत 9,051 मतांच्या फरकाने, तर प्रभाग (क) गटातील दशरथ सीताराम भगत यांनी 11,168 मते मिळवत 8,390 मतांच्या फरकाने निर्णायक विजय संपादन केला. या निकालातून प्रभाग 18 मधील चारही जागांवर भाजपने मोठ्या मताधिक्याने क्लीन स्वीप केला असून, विकासाचा स्पष्ट अजेंडा, मजबूत संघटनात्मक ताकद आणि भगत कुटुंबाचे जनतेशी असलेले घट्ट नाते हेच या ऐतिहासिक विजयाचे प्रमुख कारण ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *