राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 ची घोषणा केल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी कैलास शिंदे यांनी आवश्यक प्रशासकीय व्यवस्था कार्यान्वित केली आहे.
निवडणूक काळात आचारसंहितेचे पालन प्रभावीपणे व्हावे यासाठी आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्याचे सनियंत्रण अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या कक्षामार्फत आचारसंहितेचे निरीक्षण, नियंत्रण तसेच प्राप्त होणाऱ्या तक्रारी व निवेदनांवर नियमोचित कार्यवाही केली जाणार आहे.
आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने नागरिकांना आपल्या तक्रारी / आक्षेप नोंदवता यावेत यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेतील विभागनिहाय सहाय्यक आयुक्त व विभाग अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
📞 विभागनिहाय संपर्क क्रमांक:
- बेलापूर विभाग – प्रशांत नेरकर
📞 022-27580610 / 022-27573826 - नेरुळ विभाग – अनुराधा बाबर
📞 022-27707669 - वाशी विभाग – सुखदेव येडवे
📞 022-27655370 / 022-27659741 - तुर्भे विभाग – सागर मोरे
📞 022-27754061 / 022-27834069 - कोपरखैरणे विभाग – भरत धांडे
📞 022-27542406 / 022-27542449 - घणसोली विभाग – वसंत मुंडावरे
📞 022-27692489 / 022-27698175 - ऐरोली विभाग – नैनेश बदले
📞 022-27792114 - दिघा विभाग – ऐश्वर्या नाईक
📞 9136544027 / 9136544028 - मुख्यालय – संजय तडवी
📞 022-27567368 - टोल फ्री क्रमांक
📞 1800 222 309 / 1800 222 310
📧 ई-मेल: nmmcmcc2025@gmail.com
महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन, तक्रारी अथवा आक्षेप असल्यास वरील संपर्क माध्यमांचा वापर करून तात्काळ माहिती द्यावी. नागरिकांनी जबाबदार आणि जागरूक भूमिका घेऊन निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व लोकशाही मूल्यांनुसार पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.














Leave a Reply