“वाढदिवस समाजसेवेचा… वारसा माणुसकीचा!” | उपशहरप्रमुख शरद घोरपडे यांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम

कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 12 मध्ये सक्रियपणे कार्यरत असलेले उबाठा गटाचे उपशहरप्रमुख शरद घोरपडे यांनी आपला वाढदिवस ‘जनसेवा दिन’ म्हणून साजरा करत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. या निमित्ताने उज्वला ऑप्टिक्स यांच्या विशेष सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व सवलतीच्या दरात चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेकांनी या सुविधेचा लाभ घेतला.

यानंतर सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात उबाठा गटाच्या महिला जिल्हा संघटीका रंजना शिंत्रे, शिवसेना महिला उपजिल्हा संघटक वैशाली घोरपडे, बेस्टचे वरिष्ठ अधिकारी किशोर शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेश सचिव साधना ढबळे, कोपरखैरणे विभाग प्रमुख दत्तात्रय धनावडे, सचिन राजपुरे, विभाग प्रमुख सोपान कंक, उपविभाग प्रमुख मारुती मोरे, अविनाश मोरे, राष्ट्रवादी पक्ष उपाध्यक्ष सुयोग बेलोसे, शाखा प्रमुख विजय शेटे, दत्ता कोंढाळकर, संजय राऊत, युवासेना अक्षय गोरे, विजय मोरे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शरद घोरपडे यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक केले. “राजकारणात पदे अनेकांना मिळतात, पण लोकांच्या मनात स्थान निर्माण करणे मोजक्याच लोकांना जमतं. शरद घोरपडे यांच्या कार्यातून राजकारणापेक्षा समाजकारण आणि माणुसकीचा जिव्हाळा अधिक जाणवतो,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

कोपरखैरणे परिसरातील नागरिक, हितचिंतक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या सोहळ्याने केवळ वाढदिवस साजरा न होता, शरद घोरपडे यांनी समाजात कमावलेल्या विश्वास, माणुसकी आणि सेवाभावाचा उत्सव साजरा झाला. हा कार्यक्रम जनतेसाठी त्यांचे नेतृत्व का विश्वासार्ह आहे, याची प्रचिती देणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *