ऐरोली सेक्टर 2 येथील ज्ञानदीप शाळेच्या मैदानावर अनंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेली एकदिवसीय ‘ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा – नगरसेवक चषक 2025’ यशस्वीपणे पार पडली. ही स्पर्धा माजी नगरसेवक अनंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राकेश पेडणेकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती.
या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी महापौर सागर नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी माजी नगरसेवक अनंत सुतार, माजी नगरसेविका शशिकला सुतार तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत सेक्टर 2 परिसरातील एकूण 6 क्रिकेट संघांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या खेळातील कौशल्य, खिलाडूवृत्ती आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.
या स्पर्धेमुळे ऐरोली सेक्टर 2 मधील स्थानिक तरुणांना आपल्या क्रीडा गुणांचे प्रदर्शन करण्याची आणि संघभावना वाढवण्याची उत्तम संधी मिळाली. युवकांना सकारात्मक दिशा देणारा आणि क्रीडा संस्कृतीला चालना देणारा हा उपक्रम स्थानिक पातळीवर विशेष कौतुकास पात्र ठरला.














Leave a Reply