माजी नगरसेविका पूनम पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि अथक प्रयत्नांमुळे बेलापूर गाव, सेक्टर 19 आणि 20 येथील जीर्ण व जुन्या मासळी मार्केटच्या पुनर्निर्माणाला अखेर गती मिळाली असून, नवीन आणि अत्याधुनिक मासळी मार्केट उभारण्याच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक अमित पाटील, समाजसेवक मिथुन पाटील, मच्छीमार विक्रेता भगिनी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वपूर्ण विषयाला मार्गी लावण्यासाठी पूनम पाटील यांनी महापालिका प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा, पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटी, स्मरणपत्रे आणि अधिकारी स्तरावरील चर्चा यांचा प्रभावी वापर करून हे काम मंजूर करून घेतले. त्यांच्या जिद्दीने, चिकाटीने आणि नेतृत्वाने या नव्या प्रकल्पाला आकार मिळाला.
नवीन मार्केटमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि आधुनिकता यांना प्राधान्य देण्यात आले असून, मच्छीमार भगिनींसाठी कोल्ड स्टोरेज, ऊर्जा बचतीसाठी सोलर पॅनल, तसेच नागरिकांसाठी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध असणार आहेत.
कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थ आणि मासळी विक्रेता महिलांनी पूनम पाटील यांचे या संघर्षाला यशस्वीपणे पूर्णत्वास नेल्याबद्दल मनापासून आभार मानले आणि त्यांचे विशेष कौतुक केले.














Leave a Reply