नवी मुंबईतील सानपाडा येथे नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या माध्यमातून आयोजित ‘सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल’ (18 ते 21 डिसेंबर) बाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी लोकसहभागातून भव्य “Awareness Rally” काढण्यात आली. मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरातून युवकांना बाहेर काढून मैदानी खेळांकडे आकर्षित करणे, तसेच खेळांच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश देत आरोग्यसंपन्न समाज निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या वर्षीच्या फेस्टिवलचे ब्रीदवाक्य “Sports for Health, Spirit for Unity” असून, रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या गौरवार्थ सजविण्यात आलेला भव्य रथ होता. या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
सानपाडा पामबीच सेक्टर 1, 13 ते 19 मधील विविध सोसायट्यांतील सर्व वयोगटातील नागरिक—विद्यार्थी, महिला, पुरुष आणि ज्येष्ठ—यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. आयोजक दशरथ भगत, माजी नगरसेविका फशीबाई करसन भगत, वैजयंती भगत, रुपाली भगत तसेच प्रमुख समन्वयक निशांत भगत आणि संदीप भगत यांच्यासह अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.
या फेस्टिवलमध्ये क्रिकेट, फुटबॉल, बुद्धीबळ, मिनी-मॅरेथॉन, कॅरम, टेबल टेनिस, सायकलिंग, व्हॉलीबॉल, योगा आणि स्केटिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.














Leave a Reply