Sanjeev Naik | Akshay Thakur | Keshav Thakur | “युवा संकल्प चषक-२०२५” भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

युवा पिढीला खेळासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या सुप्त प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय ठाकूर यांनी वाशी कोपरी गाव, सेक्टर-26 येथे दोन दिवसीय “युवा संकल्प चषक 2025” या भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. 24 संघांच्या उत्साही सहभागामुळे ही स्पर्धा अत्यंत रंगतदार ठरली. स्थानिक युवा क्रिकेटपटूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी आणि स्पर्धात्मक वृत्ती बळकट करण्यासाठी एक उत्कृष्ट मंच मिळाला.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार श्री. संजीव नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी अक्षय ठाकूर यांच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे सुयोग्य नियोजन, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि खेळाडूंच्या उत्साहामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

कार्यक्रमाला समाजसेवक केशव ठाकूर, परशुराम ठाकूर, पुरुषोत्तम भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर तसेच अनेक मान्यवर आणि क्रीडाप्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

“युवा संकल्प चषक 2025” ही केवळ क्रिकेट स्पर्धा नव्हती—तर नवी मुंबईतील युवा खेळाडूंना त्यांच्या प्रतिभेला नवी दिशा देणारी, आत्मविश्वास वाढवणारी आणि खेळाडूवृत्ती विकसित करणारी एक महत्त्वपूर्ण संधी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *