वाशी पॅनेल क्रमांक 18 मध्ये पूर्व स्थायी समिती सभापती सम्पत शेवाळे, पूर्व नगरसेविका दयावती सम्पत शेवाळे आणि युवा समाजसेवक सूरज शेवाळे यांच्या संयुक्त प्रयत्नातून भव्य “स्नेह संवाद कार्यक्रम” उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे वनमंत्री श्री. गणेश नाईक यांच्या हस्ते नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मंजूर विविध विकासकामांचे शुभारंभ आणि शेवाळे जनप्रतिनिधींच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण पार पडले.
जनतेची प्रचंड उपस्थिती ही सम्पत शेवाळे यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास, प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरली. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, सुवर्ण महोत्सवी दांपत्यांचा गौरव तसेच महिलांसाठी आयोजित लकी ड्रॉमध्ये 10 विजेत्यांना पैठणी साडी आणि एका भाग्यशाली महिलेला सोनेरी नथ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगतदार बनले, तर लाइव ऑर्केस्ट्राच्या सुरांवर प्रभागातील महिलांनी सादर केलेला गरबा अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाला पूर्व खासदार संजीव नाईक, आमदार विक्रांत पाटील तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. विकास, जनसंपर्क आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम असलेला हा स्नेह संवाद कार्यक्रम प्रभागासाठी ऐतिहासिक ठरला.














Leave a Reply