ऐरोलीच्या नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे मजबूत कवच निर्माण करणारे ज्येष्ठ पूर्व नगरसेवक व भाजपा जिल्हा महामंत्री अनंत सुतार आणि माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या पुढाकाराने आयोजित मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे यशस्वी आयोजन ऐरोली सेक्टर 2, प्रभाग क्रमांक 3 येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात पार पडले.
सुतार लोकप्रतिनिधींच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या शनिवारी हे आरोग्य शिबिर नियमितपणे आयोजित केले जाते. भारतीय जनता पार्टी, ऐरोली; अनंत प्रतिष्ठान; जनसेवा सामाजिक ट्रस्ट आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटल, नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाते. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे.
शिबिरादरम्यान अनंत सुतार आणि शशिकला सुतार हे दांपत्य स्वतः उपस्थित राहून शिबिरात आलेल्या प्रत्येक नागरिकाशी संवाद साधत त्यांच्या आरोग्याची चौकशी करत होते. त्यांनी आरोग्य सेवेची गुणवत्ता, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांना दिली जाणारी उपचारपद्धती यांची पाहणी केली. त्यांच्या या उपक्रमाचा लाभ घेत ऐरोली परिसरातील शेकडो नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी आणि उपचार मिळाले.
या शिबिरात नागरिकांसाठी एकाच ठिकाणी विविध तज्ञांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या— जनरल मेडिसीन, नेत्र तपासणी, सर्जरी सल्ला, त्वचारोग मार्गदर्शन, ईएनटी तपासणी, स्त्रीरोग सल्ला, बालरोग तपासणी, रक्तदाब मोजणी तसेच मोफत औषधोपचार. त्यामुळे नागरिकांना सर्व सुविधा एका छताखाली मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला.
सुतार लोकप्रतिनिधींचे कार्य केवळ राजकीय क्षेत्रापुरते मर्यादित नसून, त्यांनी गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ ऐरोलीतील जनतेची निःस्वार्थ सेवा करत भावनिक नाते जपले आहे. त्यांच्या नेतृत्वात केले जाणारे हे आरोग्य शिबिर म्हणजे फक्त एक उपक्रम नसून, नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांच्या मनात असलेल्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे.
माजी नगरसेविका शशिकला सुतार यांनी सांगितले की, ऐरोलीतील प्रत्येक नागरिकापर्यंत मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचावी हीच त्यांची तळमळ असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
शिबिराचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी मोठ्या समाधानाने मत व्यक्त केले की, घराजवळच उपलब्ध होणारी तज्ज्ञ डॉक्टरांची तपासणी आणि वेळेवर मिळणारा उपचार हा सुतार दांपत्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम आहे. आरोग्याच्या काळजीसाठी ते जे उपक्रम राबवत आहेत, ते निश्चितच कौतुक करण्याजोगे आहेत.














Leave a Reply