दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ऐरोली पॅनल क्रमांक ३ मध्ये माजी जेष्ठ नगरसेवक अनंत सुतार आणि माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या विशेष प्रयत्नातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या महत्त्वपूर्ण “नागरी विकास कामांचा” भूमिपूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुतार लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत आणि मोठ्या संख्येने नागरिकांच्या सहभागाने हा सोहळा पार पडला.
यावेळी प्यारेलाल प्रजापती हॉल ते शिवकॉलनी गल्ली क्रमांक – ५ पर्यंत मलनि:सारण वहिनी बदलण्याच्या कामाचा शुभारंभ , प्यारेलाल प्रजापती हॉल ते शिवकॉलनी गल्ली क्रमांक- ५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन ,प्यारेलाल प्रजापती हॉल ते शिवकॉलनी गल्ली क्रमांक – ५ येथील गटार व पदपथ बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन ….या कामांचा समावेश होता .
नेहमीच नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुतार लोकप्रतिनिधींची भूमिका निर्णायक ठरली आहे. या प्रभागात त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून आणि अथक पाठपुराव्यातून उपलब्ध झालेल्या या सुविधा खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची पोचपावती देत आहेत.
यावेळी सुतार लोकप्रतिनिधींनी नागरिकांशी संवाद साधत, नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे आपले प्राधान्य असून, विकासकामांसाठी यापुढेही आपला पाठपुरावा सुरू राहील, अशी ग्वाही दिली. या विकासकामांमुळे या भागातील नागरिकांची गैरसोय दूर होणार असून, येथील रहिवाशांनी सुतार लोकप्रतिनिधींचे आभार मानले.
हा सोहळा म्हणजे ऐरोली पॅनल ३ मध्ये विकासपर्वाची दिवाळी असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
विकास कामांच्या भूमिपूजनासोबतच सुतार लोकप्रतिनिधींनी प्रभागातील नागरिकांना ‘आपुलकीची दिवाळी’ स्नेह भेट देऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित केला .














Leave a Reply