समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ आणि प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारे असे व्यक्तिमत्व… शिवसेना नवी मुंबई उपशहरप्रमुख अक्षय म्हात्रे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम, महिलांसाठी खास खेळ आणि ‘गोठवली भूषण पुरस्कार’ समारोहासह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा वाढदिवस केवळ एक सोहळा नव्हता, तर समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी दर्शवणारा एक महत्त्वाचा दिवस ठरला.
या सोहळ्याची सुरुवात सकाळच्या सत्रात एका महत्त्वपूर्ण उपक्रमाने झाली. अक्षय म्हात्रे युवा मंच आणि ऑपल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गोठवली गाव येथे मोफत आरोग्य तपासणी, डोळे तपासणी आणि मोफत चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात नागरिकांची हृदयरोग तपासणी, बीपी तपासणी, शुगर तपासणी आणि हाडांची तपासणी यांसारख्या गंभीर व महत्त्वाच्या तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात आल्या.मोठ्या संख्येने नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, स्वतः अक्षय म्हात्रे हे जातीने उपस्थित होते. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
या वेळी नागरिकांनी अक्षय म्हात्रे यांचे आभार मानले आणि ते सर्वांसाठी उपलब्ध असणारे युवा समाजसेवक असल्याचे मत नोंदवले.
सायंकाळच्या सत्रात अक्षय म्हात्रे यांचा अभिष्टचिंतन सोहळा तसेच महिला आणि कर्तृत्ववान व्यक्तींसाठी खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ आणि ‘लकी ड्रॉ’ यांसारखे उत्साहपूर्ण खेळ आयोजित करण्यात आले, तर मुख्य आकर्षण ठरले ते ‘गोठवली भूषण पुरस्कार’ प्रदान सोहळा. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गोठवली गावातील कर्तृत्ववान व्यक्तींचा यावेळी गोठवली भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महिलांसाठी आयोजित ‘पैठणीचा खेळ’, ‘होम मिनिस्टर’ आणि ‘लकी ड्रॉ’ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे सायंकाळच्या सत्रात एक आनंदी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या सोहळ्याला जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक मनोज हळदणकर , माजी नगरसेवक राजू पाटील, समाजसेवक गगनदीप कोहली व बंडू केणी, युवा नेते शुभम चौगुले… आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबईचे युवा नेतृत्व अक्षय म्हात्रे यांनी आपला वाढदिवस समाजाला समर्पित करत एक आदर्श पायंडा पाडला आहे. आरोग्य तपासणी असो वा कर्तृत्ववानांचा सन्मान… समाजाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या या उपक्रमांमुळे अक्षय म्हात्रे यांच्या लोकप्रियतेत आणि कामाच्या कक्षा रुंदावण्यात नक्कीच भर पडली आहे














Leave a Reply