राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून आयोजित नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या बैठकीत, समाजसेवक विजय वाळुंज यांनी नागरिकांच्या मूलभूत आणि अत्यावश्यक समस्यांना वाचा फोडली .विजय वाळुंज यांनी प्रामुख्याने नागरिकांच्या वतीने पाच प्रमुख मागण्या प्रकर्षाने मांडल्या.
यामध्ये विभागातील तिन्ही उद्यानांचे दर्जेदार पुनर्विकसन करून सुविधा उपलब्ध करणे, तसेच ए-टाईप व बी-टू टाईप परिसरात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकणे, आणि वारंवार चोकअप होणाऱ्या सीवरेज लाईनवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून नवीन सीवरेज लाईनची कामे त्वरित हाती घेणे या विषयांचा समावेश होता. यासोबतच, परिसरातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती व काँक्रिटीकरण आणि विष्णुदास भावे नाट्यगृहातील प्रलंबित अत्यावश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणीही विजय वाळुंज यांनी केली. यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी विजय वाळुंज यांची मांडलेल्या सर्व मागण्यांची गंभीर दखल घेऊन, महानगरपालिका प्रशासनाला यावर त्वरित व सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या .














Leave a Reply