नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच नवी मुंबईतील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर, स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे आयोजित या पक्षप्रवेश सोहळ्यात अंकुश कदम यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले.अंकुश कदम यांच्या प्रवेशामुळे नवी मुंबईच्या राजकीय आखाड्यात चुरस वाढली असून, स्वराज्य संघटनेला मात्र मोठा धक्का बसला आहे. यावेळी, शिवसेना पक्षसंघटनेच्या वाढीसाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार अंकुश कदम यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नरेश मस्के, उपनेते विजय नाहटा व विजय चौगुले, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर आणि द्वारकानाथ भोईर, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कदम यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Leave a Reply