गणेशोत्सवाच्या निमित्ताने नवी मुंबई शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांनी गेली ३२ वर्षे जपलेली एक आगळीवेगळी परंपरा यंदाही कायम ठेवली. कन्या आणि युवती सेनेच्या शहरअधिकारी अश्विनी माने यांच्यासोबत नेरुळ पॅनल क्रमांक – २३ आणि २४ मधील सर्व घरगुती गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले व सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या .प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन त्यांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले आणि सर्वांशी आपुलकीने संवाद साधला.
यावेळी नवी मुंबई शिवसेना -युवासेना जिल्हा सचिव तेजस माने ,नवी मुंबई शिवसेनेचे पदाधिकारी बाबासाहेब रोकडे . शशिकांत गोरड, विनय शेडगे. कविता बारवे , भरती बिरमने,अमृता जाधव. मानसी थोरात.अशोक पवार. अशोक कुराडे. विशाल जाधव, गंजितसिंह हजारे ,यशवंत कांबळे आदी उपिस्थत होते .
विजय माने हे जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांची २४ तास जनतेसाठी उपलब्ध असण्याची कार्यशैली आणि निस्वार्थ वृत्ती यामुळेच त्यांनी लोकांच्या मनात एक विश्वासार्ह आणि आदराची जागा मिळवली आहे. त्यांच्या कामातून केवळ कर्तव्यपूर्तीच नाही, तर जनतेशी असलेले त्यांचे आपुलकीचे नाते दिसून येते,याच आपुलकीच्या नात्यामुळे विजय माने हे केवळ लोकप्रतिनिधी नसून, खऱ्या अर्थाने लोकांचे आधारस्तंभ आहेत, अशी भावना याप्रसंगी अनेक रहिवाशांनी व्यक्त केली.














Leave a Reply