मुंबई – गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे विराजमान श्री गणरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्याचे वनमंत्री श्री. गणेश नाईक यांनी सहकुटुंब भेट दिली.
वनमंत्री गणेश नाईक यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “गणराय हा श्रद्धा आणि एकतेचा प्रतीक आहे. राज्यातील प्रत्येक घराघरात बाप्पाचे आगमन ही परंपरा आपल्याला सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देते.”
या वेळी मंत्रिमंडळातील मान्यवर, विविध विभागांचे अधिकारी आणि अनेक गणेशभक्त उपस्थित होते. वातावरणात सतत गजर होणाऱ्या “गणपती बाप्पा मोरया” च्या घोषणांनी भाविकांच्या मनात भक्तिभाव आणि आनंदाची लहर पसरली होती.














Leave a Reply