४ दशकांपासून सुरू असलेल्या परंपरेला पुढे नेत, नवी मुंबईतील प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – सेक्टर 16A च्या अध्यक्ष विजय वाळुंज आणि पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली “गणराज वाशीचा – राजा नवी मुंबईचा” चा भव्य आगमन सोहळा उत्साह, भक्तीभाव आणि जल्लोषाच्या वातावरणात संपन्न झाला.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या भव्य मिरवणुकीत बाप्पाच्या दिव्य व तेजस्वी रूपाने संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून गेला. गाजे-बाजे, ढोल-ताशा, नगारे, लेझीम, नाशिक ढोल यांच्या गजरात वातावरण मोरयाघोषाने दुमदुमले.
या आगमन सोहळ्यात :
- सायन-धारावी मोरया बीट्स आणि जे. बी. बॉईज नाशिक ढोल पथक यांच्या गर्जनेने भक्तिमय ऊर्जा निर्माण केली.
- आदित्य गोविंदा पथकाने बाप्पाला दिलेली सलामी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली.
- शिवशक्ती महिला लेझीम पथकाने सांस्कृतिक मानवंदना दिली.
- शिवकालीन मर्दानी खेळ यांनी सोहळ्यात ऐतिहासिक आणि पारंपरिक रंग भरले.
“गणराज वाशीचा – राजा नवी मुंबईचा” च्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी असंख्य गणेशभक्तांची गर्दी उसळली होती.
या प्रसंगी मंडळ अध्यक्ष विजय वाळुंज, माजी नगरसेविका अंजली वाळुंज, तसेच प्रभागातील माजी नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.
अध्यक्ष विजय वाळुंज यांनी सांगितले की –
👉 “यंदा मंडळाने पर्यावरणपूरक गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली असून ‘Safe Wildlife – Save Animal Life’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प घेतला आहे.”
माजी नगरसेविका अंजली वाळुंज यांनीही पर्यावरण रक्षण व सामाजिक बांधिलकीबाबत मंडळाचा संदेश स्पष्ट केला.














Leave a Reply