सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्य करताना कमी वेळेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या शिवसेना संघटिका, सानपाडा आणि स्वामिनी महिला मंडळ अध्यक्षा, उच्च शिक्षित प्रियंका अविनाश जाधव यांनी आपला वाढदिवस महिला शक्तीच्या सेवेसाठी अर्पण करत सानपाडा प्रभागातील महिलांसाठी मोफत थर्मल स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन केले. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना वरिष्ठ पदाधिकारी अजित सावंत, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख आरती विचारे आणि प्रियंका जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, एकनाथ हिस्क आरोग्य वर्ष आणि संजीवनी कॅन्सर केअर हॉस्पिटलच्या विशेष सहकार्याने आयोजित या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी शिवसेना महिला जिल्हा संघटिका सरोज पाटील, माजी नगरसेविका कोमल वास्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात प्रभागातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोफत स्तन कर्करोग तपासणी करून घेतली व शिबिराचा लाभ घेतला. महिलांनी उपस्थित राहून प्रियंका जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.
प्रियंका जाधव म्हणाल्या, “वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून आयोजित मोफत थर्मल स्तन कर्करोग तपासणी शिबिर ही काळाची गरज आहे. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे शिबिर यशस्वी झाले.” यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रियंका जाधव यांच्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “वाढदिवशी लोकसेवा करणे हीच सर्वात मोठी सेवा आहे.”
Sanpada | प्रियंका जाधव यांनी वाढदिवशी महिलांसाठी आयोजित केले मोफत स्तन कर्करोग तपासणी शिबिर














Leave a Reply