नवी मुंबई : आपल्या कामाच्या जोरावर जनतेचा विश्वास कायम राखणाऱ्या माजी नगरसेविका सरोज पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रोहिदास पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर अग्रोळी ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, अग्रोळी मुळगावठाण परिसरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, गटार व पदपथ बांधकामाच्या कामाचा शुभारंभ ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
गावातील रस्त्यांची दुरवस्था व गटारांच्या समस्येमुळे नागरिकांना सातत्याने त्रास सहन करावा लागत होता. ग्रामस्थ मंडळ व स्थानिक नागरिकांच्या मागण्यांनंतर, सरोज पाटील व रोहिदास पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळताच हे काम मंजूर झाले.
या कार्यक्रमास ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष गजानन पाटील, बाळकृष्ण म्हात्रे, उपाध्यक्ष राजेश पाटील, सचिव संजय पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
“हे काम अतिशय दर्जेदार व्हावे, ज्यामुळे पुढील दहा वर्षे कोणताही त्रास नागरिकांना होणार नाही,” असा विश्वास यावेळी सरोज पाटील व रोहिदास पाटील यांनी व्यक्त केला.
ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, “सरोज पाटील या नेहमीच लोकांच्या समस्या प्राधान्याने सोडवतात, म्हणूनच त्या खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रतिनिधी आहेत.”














Leave a Reply