नवी मुंबईतील गावठाणे शहराच्या विकासाचा एक अविभाज्य भाग असूनही स्वच्छतेच्या बाबतीत ती अनेकदा दुर्लक्षित राहतात. याच समस्येवर मात करण्यासाठी शिवसेनेचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘ स्वच्छ परिसर अभियान – डीप क्लीन ड्राईव्ह ‘ सुरू करण्यात आले. या अभियानाचा तिसरा टप्पा नुकताच युवासेना बेलापूर विधानसभा समन्वयक भावेश पाटील यांच्या पुढाकाराने जुहू गाव (वाशी) येथे यशस्वीरित्या पार पडला.
युवासेनेच्या वतीने शाखाप्रमुख रामनाथ पाटील व अर्चना पई यांच्या संयोजनातून राबवण्यात आलेल्या या मोहिमेत स्थानिक नागरिक, युवा सैनिक आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्र येऊन गावातील गल्लीबोळांमधील कचरा, सार्वजनिक ठिकाणी साचलेली घाण आणि आरोग्याला हानिकारक वस्तूंची साफसफाई केली.या अभियानामुळे केवळ परिसर स्वच्छ झाला नाही, तर स्थानिकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता हि वाढली आहे.
या अभियानादरम्यान, एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. प्रत्येक गावठाणातून दररोज सरासरी जवळपास अर्धा टन कचरा निर्माण होतो, ज्याची योग्य विल्हेवाट लावणे ही एक मोठी गरज बनली आहे.














Leave a Reply