आधुनिक युगात महिलांना त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासोबतच, त्यांना आपल्या परंपरांशी जोडून ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे. ‘We मुक्ता’ या व्यासपीठाने हाच दुवा साधत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात श्रावणोत्सव २०२५ चे यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘वी मुक्ता’ च्या संस्थापिका नेत्रा गुजराथी यांनी महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक जपणूक यांचा एक सुंदर संगम घडवून आणला.
श्रावण महिन्याचे पावित्र्य आणि उत्साह साजरा करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात समूह मंगळागौर स्पर्धा, लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत गप्पा आणि रंजक ‘वन मिनिट गेम शो’ सारख्या विविध कार्यक्रमांचा समावेश होता. यामुळे महिलांना मनोरंजनासोबतच त्यांच्यातील कलागुणांना व्यक्त करण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमाला अभिनेत्री रसिका वाखरकर आणि लावणी सम्राट अश्मिक कामठे यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली तर या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभलेले माजी नगरसेविका अंजली वाळुंज आणि समाजसेवक विजय वाळुंज यांच्यासह समाजसेविका अर्चना वाळुंज हे देखील उपस्थित होते . तर माजी नगरसेविका मीरा पाटील तसेच, विविध क्षेत्रातील महिला व्यक्तिमत्त्वांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती .
या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकवटलेल्या नवी मुंबईतील संपूर्ण नारी शक्तीला – मार्गर्दर्शन करताना माजी नगरसेविका अंजली वाळुंज आणि समाजसेवक विजय वाळुंज यांनी ‘नेत्रा गुजराथी यांच्या कार्याची प्रशंसा करत सांगितले कि , ‘We मुक्ता ” व्यासपीठ केवळ मनोरंजनाचे साधन नसून, महिलांच्या एकीचे आणि त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवणारी एक चळवळ आहे. महिला सक्षमीकरणासाठी असे कार्यक्रम निश्चितच महत्त्वाचे ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. श्रावणोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना लोकप्रतिनिधी वाळुंज यांनी सांगितले की, “श्रावणोत्सव २०२५ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर तो नवी मुंबईतील नारीशक्तीच्या उत्साहाचा आणि एकजुटीचा उत्सव होता.” त्यांनी या यशस्वी आयोजनाबद्दल ‘We मुक्ता व्यासपीठ आणि संस्थापिका नेत्रा गुजराथी यांच्या संकल्पनेचे कौतुक केले.














Leave a Reply