नवी मुंबई: संपूर्ण भारतवर्षाचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष असलेले १२ किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झळकले आहेत. ही घटना केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आहे.
मराठी अस्मितेचा हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी भाजप, नवी मुंबई जिल्ह्याच्यावतीने जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे “जल्लोष कार्यक्रम” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
या कार्यक्रमाला भाजपचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, युवा मोर्चा, महिला मोर्चा आणि विविध प्रकोष्ठचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Leave a Reply