सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत राहून अल्पावधीतच नवी मुंबईत आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे नवी मुंबई युवासेना उपजिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सानपाडा येथे एका भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करून आपले सामाजिक कार्यत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे .
नवी मुंबई युवासेना उपजिल्हाप्रमुख अविनाश जाधव आणि सानपाडा विभाग संघटिका प्रियांका जाधव हे तरुण आणि सुशिक्षित दांपत्य आज त्यांच्या सामाजिक कार्यांमुळे आणि दांडग्या जनसंपर्कामुळे सानपाडा प्रभागामध्ये विशेषत्वाने ओळखले जातेआणि म्हणूनच अविनाश जाधव या तरुण नेतृत्वाने आपल्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर हा सामाजिक उपक्रम वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या विशेष सहकार्याने आयोजित केला होता . या समाजोपयोगी शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते संपन्न झाले.
नवी मुंबईतील विविध प्रसिद्ध रुग्णालयांच्या माध्यमातून आयोजित या शिबिरामध्ये नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये बीपी , शुगर तपासणी, ईसीजी , मोफत औषधे वाटप, नेत्र तपासणी व चष्मा वाटप, डेंटल चेकअप , मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया मार्गदर्शन, PSA ब्लड टेस्ट, ओरल कॅन्सर तपासणी, BMI , त्वचेचे आजार फुफ्फुस तपासणी आणि कान तपासणी आदी तपासण्यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे, आरोग्य तपासणीसोबतच या शिबिरामध्ये नागरिकांसाठी आधारकार्ड शिबिर आणि आरोग्य विमा मार्गदर्शन शिबिर देखील ठेवण्यात आले होते. यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी आरोग्य सेवांसोबतच आवश्यक प्रशासकीय माहिती व मदत उपलब्ध झाली. मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या .यावेळी एक्सपर्ट डॉक्टरांच्या टीमकडून नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या .
यावेळी शिबिराला भेट देण्यासाठी युवा नेते ममित चौगुले, शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी अजित सावंत, मिलिंद सूर्यराव, रामचंद्र पाटील, शहर प्रमुख विजय माने, दिलीप घोडेकर, सोमनाथ वासकर, प्रकाश माटे, भावेश पाटील, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख आरती विचारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अविनाश जाधव आणि प्रियांका जाधव या तरुण दांपत्याने वाढदिवसासारख्या प्रसंगी सामाजिक उपक्रम राबवून दाखवलेली ही बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या
अविनाश जाधव आणि प्रियांका जाधव यांच्या माध्यमातून आयोजित शिबिराचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी देखील यावेळी त्यांच्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत आभार व्यक्त केले.














Leave a Reply