महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री व पालकमंत्री – पालघर जिल्हा तथा ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना. गणेशजी नाईक यांचा लोकाभिमुख असा जनता दरबार वाशी येथील विष्णुदास नाट्यगृहात आज आयोजित होता. यावेळी ना. गणेशजी नाईक यांना युवा नेते निशांत भगत यांनी स्थानिक माजी नगरसेविका रुपाली निशांत भगत यांच्या वतीने पत्राद्वारे सानपाडा-पामबीच येथील सेक्टर १७ मधील दि अफेअर्स या इमारतीत तळमजल्यावर प्रस्तावित ऑर्केस्ट्रा (डान्स) बार ला विरोध असल्याचे निवेदन सादर केले.
सानपाडा - सोनखार (पामबीच ) येथील असलेल्या एकूण नऊ सेक्टर्स मधील नागरिकांनी व सर्वच गृहनिर्माण सोसायटयांनी याठिकाणी येणाऱ्या ऑर्केस्ट्रा बार ला हजारोंच्या संख्येने हरकती सूचना तत्सम प्रशासकीय विभागाकडे लेखी स्वरूपात नोंदविल्या आहेत. संदर्भात संबंधित प्राधिकरणानी परवानगी दिल्यास तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडले जाईल असा देखील लेखी इशारा देण्यात आलेला होता.
ज्याउपर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी सदरच्या आस्थानेस ऑर्केस्ट्रा व परमिट बार चा परवाना देण्याचे नाकारल्याने संबंधित आस्थापना मालकाने कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे याप्रकरणी धाव घेतली आहे, याबाबतीत नुकतीच २४ जून २०२५ रोजी स्थानिक माजी नगरसेविका वैजयंती दशरथ भगत व निशांत करसन भगत यांनी विभागातील निवासी नागरिकां समवेत मा. कोकण विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन सदर बाबतीत वस्तुस्थिती व जनभावना अवगत केली आहे.
आज यासंदर्भातील या परिसरातील रहिवासीय यांच्या या बार विरोधातील तीव्र भावना मा. ना. गणेशजी नाईक यांच्या वाशी येथील आयोजित जनता दरबारात निवेदनातून निशांत भगत यांनी मांडल्या असता, मंत्री महोदयांनी मा. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना त्वरित संपर्क साधून या प्रस्तावित बार ला जनतेचा विरोध व सामाजिक वातावरण कलुशीत होऊ नये म्हणून परवानगी नाकारण्या बाबत निर्देशीत केले.
सोनखार – पामबीच विभागातील सर्व रहिवासी नागरिक व सोसायटी पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही मा. ना. गणेशजी नाईक साहेब यांनी सामाजिक आशय व लोककल्याण या भूमिकेतून ज्या तत्परतेने संबंधितांना निर्देश दिले त्याबद्दल आम्ही दादांचे ऋणी आहोत.
– निशांत करसन भगत














Leave a Reply