आंतरराष्ट्रीय योग दिनी 21 जूनला सकाळी 6.30 वा. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन

21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना यावर्षी ‘एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग’ (Yoga for One Earth, One Health) ही असून त्यानुसार केवळ भारतातच नव्हे तर जगातील विविध देशात योगदिन साजरा होत आहे.

भारतीय संस्कृती मधील योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते. जगभरात स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व या दिनानिमित्त अधोरेखित केले जाते.

स्वच्छ शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई शहरातील आंतरराष्ट्रीय योग दिवस हा स्वच्छता, आरोग्य आणि योग यांचा परस्परसंबंध लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छतेतून आरोग्य – आरोग्यासाठी योग’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून साजरा करण्यात येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा विशेष कार्यक्रम सिडको आणि द आर्ट ऑफ लिव्हींग यांच्या सहयोगाने शनिवार दि. 21 जून, 2025 रोजी, सकाळी 6.30 वा., वाशी रेल्वे स्टेशनजवळील सिडको प्रदर्शनी केंद्रामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे.

तरी स्वच्छता व आरोग्यप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी तसेच विविध संस्था, संघटना, मंडळे यांचे पदाधिकारी व सदस्य, शिक्षक व विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांनी वैयक्तिक व सामाजिक आरोग्य जपणूकीचे महत्व अधोरेखित करण्यासाठी तसेच योगासनांतून आरोग्य संवर्धनाचा संदेश प्रसारित करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *