सायन पनवेल महामार्गावर विशेष सखोल स्वच्छता मोहीम

स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत स्वच्छता मोहीमा सातत्याने राबविल्या जात असून त्यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकसहभागावर भर देण्यात येत आहे. पावसाळी कालावधीत स्वच्छतेवर अधिक लक्ष देत नवी मुंबई शहरातून जाणारा तथापी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित नसलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा सायन पनवेल महामार्ग स्वच्छ राखण्याकडे आयुक्तांच्या निर्देशानुसार विशेष लक्ष दिले जात आहे.

या अनुषंगाने रविवार 15 जून व सोमवार 16 जून अशा सलग दोन दिवशी सायन पनवेल महामार्गावर नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून वाशी टोल नाका ते बेलापूर खिंड अशा नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील सायन पनवेल माहामार्गाची सखोल स्वच्छता करण्यात आली.

यामध्ये वाशी विभागाचे सहा.आयुक्त श्री. सुखदेव येडवे, नेरुळ विभागाचे सहा.आयुक्त श्री. जयंत जावडेकर, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांच्या निरीक्षणाखाली स्वच्छता अधिकारी श्रीम. जयश्री आढळ, श्री. अरुण पाटील व श्री. नरेश अंधेर या स्वच्छता अधिका-यांनी स्वच्छता निरीक्षक व उप स्वच्छता निरीक्षक यांच्या सहयोगाने स्वच्छता मित्रांच्या मदतीने आपापल्या क्षेत्रातील महामार्ग स्वच्छतेची जबाबदारी नेटकेपणाने पार पाडली.

परिमंडळ 2 मध्येही घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली – मुलूंड खाडी पूल व सर्व्हिस रस्त्याची सखोल स्वच्छता करुन घेण्यात आली.

सायन पनवेल महामार्ग, ठाणे बेलापूर मार्ग हे शहरातील अत्यंत वर्दळीचे रस्ते असून दररोज हजारो वाहने ये – जा करत असतात. त्यामुळे शहराची स्वच्छ शहर प्रतिमा उंचावण्यासाठी महानगरपालिकेच्या अखत्यारित नसला तरी सायन पनवेल महामार्गाची नियमित स्वच्छता राखण्याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले आहेत. व त्यानुसार स्वच्छता मोहीमा राबविण्यावर भर दिला जात आहे.स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत स्वच्छता मोहीमा सातत्याने राबविल्या जात असून त्यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकसहभागावर भर देण्यात येत आहे. पावसाळी कालावधीत स्वच्छतेवर अधिक लक्ष देत नवी मुंबई शहरातून जाणारा तथापी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित नसलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा सायन पनवेल महामार्ग स्वच्छ राखण्याकडे आयुक्तांच्या निर्देशानुसार विशेष लक्ष दिले जात आहे.

या अनुषंगाने रविवार 15 जून व सोमवार 16 जून अशा सलग दोन दिवशी सायन पनवेल महामार्गावर नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून वाशी टोल नाका ते बेलापूर खिंड अशा नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील सायन पनवेल माहामार्गाची सखोल स्वच्छता करण्यात आली.

यामध्ये वाशी विभागाचे सहा.आयुक्त श्री. सुखदेव येडवे, नेरुळ विभागाचे सहा.आयुक्त श्री. जयंत जावडेकर, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांच्या निरीक्षणाखाली स्वच्छता अधिकारी श्रीम. जयश्री आढळ, श्री. अरुण पाटील व श्री. नरेश अंधेर या स्वच्छता अधिका-यांनी स्वच्छता निरीक्षक व उप स्वच्छता निरीक्षक यांच्या सहयोगाने स्वच्छता मित्रांच्या मदतीने आपापल्या क्षेत्रातील महामार्ग स्वच्छतेची जबाबदारी नेटकेपणाने पार पाडली.

परिमंडळ 2 मध्येही घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली – मुलूंड खाडी पूल व सर्व्हिस रस्त्याची सखोल स्वच्छता करुन घेण्यात आली.

सायन पनवेल महामार्ग, ठाणे बेलापूर मार्ग हे शहरातील अत्यंत वर्दळीचे रस्ते असून दररोज हजारो वाहने ये – जा करत असतात. त्यामुळे शहराची स्वच्छ शहर प्रतिमा उंचावण्यासाठी महानगरपालिकेच्या अखत्यारित नसला तरी सायन पनवेल महामार्गाची नियमित स्वच्छता राखण्याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले आहेत. व त्यानुसार स्वच्छता मोहीमा राबविण्यावर भर दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *