नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कोपरखैरणे विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत 1. श्री. निशांत सुरेश नाईक,घर क्र 1337,युनिट्स नं 002,बोनकोडे गाव, कोपरखैरणे, नवी मुंबई व 2. श्री. सुशांत सुभाष नाईक, घर क्र 1337,युनिट्स नं 004,बोनकोडे गाव, कोपरखैरणे, नवी मुंबई यांच्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये दिनांक 27-01-2025 रोजी नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर निष्कासनाची कार्यवाही करण्यात आली.
तसेच अनधिकृत बांधकाम धारकानकडून प्रत्येकी रु 20,000/- असा एकूण 40,000/- रुपये दंडाचे धनादेश वसूल करण्यात आले.
सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. भरत ऊ धांडे, कनिष्ठ अभियंता श्री.चंद्रकांत धोत्रे व इतर अधिकारी/कर्मचारी व न.मुं.म.पा पोलीस बंदोबस्त उपस्थित होते. तसेच सदर कारवाईसाठी 6 मजूर, 02 इलेक्ट्रॉनिक हॅमर, पिकअप व्हॅन 01, गॅस कटर 01, वापर करण्यात आले.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.














Leave a Reply