दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी महापौर सौ. सुजाता सुरज पाटील यांच्या शुभेच्छा


दहावी आणि बारावीची परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाची पायरी आहे. ही केवळ गुणांची परीक्षा नसून, आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीचीही कसोटी आहे. त्यामुळे कोणतेही दडपण न घेता सकारात्मक दृष्टिकोनातून आणि उत्साहाने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर सौ. सुजाता सुरज पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी मेहनत घेऊन तयारी केली आहे. त्या परिश्रमांचे फळ नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला. परीक्षा देताना मन शांत ठेवावे, वेळेचे योग्य नियोजन करावे, आरोग्याची काळजी घ्यावी आणि परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचावे, यावरही त्यांनी भर दिला.
विद्यार्थ्यांच्या यशात त्यांच्या आई-वडिलांची स्वप्ने आणि शिक्षकांचे मार्गदर्शन सामावलेले असते. मेहनत, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचारांच्या बळावर नवी मुंबईतील विद्यार्थी राज्यात आपला ठसा उमटवतील, असा विश्वास व्यक्त करत महापौर सौ. सुजाता पाटील यांनी सर्व दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *