पाट हायस्कूलमध्ये नगरसेवक किशोर पाटकर यांच्यातर्फे सत्कार सोहळा .

किशोर पाटकर नगरसेवक यांच्यातर्फे दिया सामंत हिचा एक लाख रुपये रक्कम देऊन सत्कार .

दिया निलेश सामंत हिने एस .एस .सी .परीक्षा अर्थात माध्यमिक शाळांत परीक्षा 2025 26 मध्ये शंभर टक्के गुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल नगरसेवक किशोर अशोक पाटकर शिवसेना जिल्हाप्रमुख बेलापूर विधानसभा यांच्यातर्फे रोख रक्कम ,एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन कौतुक करण्यात आले . आजच्या सत्कार समारंभामध्ये मुख्याध्यापक सयाजी बोंदर यांनी गुलाब पुष्प देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किशोर पाटकर मित्र परिवारातील नरेश परब ग्रंथपाल पणदूर हायस्कूल ,अविनाश वालावलकर ,हेबाळकर सर दियाचे पालक निलेश सामंत, नेहा सामंत ,बहिण सानिया सामंत उपस्थित होते .संस्था व विद्यालयातर्फे या प्रमुख मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी नरेश परब ,अविनाश वालावलकर ,निलेश सामंत संस्था कार्यवाह विजय ठाकूर जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली . यापूर्वी नगरसेवक किशोर पाटकर यांनी विद्यार्थ्यांना मोफत २०० सायकलींचे वाटप केले ‘संस्थेच्या विविध उपक्रमामध्ये त्यांचे नेहमी सहकार्य असते . दिया निलेश सामंत हिच कौतुक करताना सन्मानपत्रांमध्ये आपली ही अभिमानास्पद कामगिरी आपल्या कठोर परिश्रमाची जिद्दीची व सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रेरणादायी फलित आहे .आपले यश निश्चितच असंख्य विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंबासारखे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल असा संदेश दिला आहे संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर कार्यवाह विजय ठाकूर जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर मुख्याध्यापक सयाजी बोंदर ,पर्यवेक्षिका अंकिता मोडक ,गुणवत्ता वाढ प्रमुख विनायक कांबळे, वर्गशिक्षिका सुमती मळेकर, व्यासपीठावर उपस्थित होते .या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप साळसकर तर आभार पर्यवेक्षिका अंकिता मोडक यांनी मानले .

किशोर पाटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळेतील मुलांना आतापर्यंत १५०० ते २००० सायकली वाटप केल्या आहेत. त्यांना शिक्षणाचे खूप महत्त्व वाटते. मुलांना शाळेत जाण्यास अडचण येऊ नये आणि त्यांचे शिक्षण चांगले व्हावे यासाठी ते नेहमी मदत करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *