बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना तातडीने नोकरी : वनमंत्री श्री.गणेशजी नाईक यांचा प्रस्ताव

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी विधानभवन येथे प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला.

वनविभागाशी संबंधित काही महत्त्वाच्या विषयांवर बोलताना वनमंत्री गणेशजी नाईक यांनी बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांसाठी अत्यंत संवेदनशील निर्णय जाहीर केला.यावेळी त्यांनी सांगितले कि ,”बिबट्यांनी ज्या लोकांचे जीव घेतले,त्यांच्या कुटुंबाला भेट दिली असता घरातील आधारस्तंभ गमावल्यानंतर कुटुंब पूर्णपणे हताश होते,” असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

त्यामुळे,जर त्या कुटुंबामध्ये १८ वर्षे ओलांडलेला वारस असेल,तर त्याला लगेच वनविभागात नोकरीवर ठेवावे आणि कालांतराने राज्य शासनाच्या नियमानुसार त्याला कायमस्वरूपी करावे अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवणार अशी माहिती वनमंत्री गणेशजी नाईक यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *