नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या विमान उड्डाणापूर्वी दिबासाहेबांचे नाव दिले जावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे वने मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज नागपूर येथे चर्चा भेट घेतली. लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ नामकरणाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण सकारात्मक असल्याचे आणि या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला आश्वस्थ केले आहे यावेळी लोकनेते दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार किसन कथोरे, आमदार महेश बालदी, तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या २५ तारखेला खुला होणार आहे. तो खुला होण्याच्या आधी राज्य सरकारने या विमानतळाला घोषित केलेले लोकनेते दि. बा. पाटील हे नामकरण किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेतील दिबांच्या नावाचा नामविस्तार व्हावे या दृष्टिकोनातून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वस्थ केले आहे त्यामुळे विमानतळाला दि. बा पाटील साहेबांचे नाव लागणारच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या यासंदर्भात त्यांनी प्रेस स्टेटमेंट द्यावे अशी आमच्या शिष्टमंडळाने विनंती केली, त्यावर त्यांनी या संदर्भामध्ये लवकरच यथायोग्य प्रेस स्टेटमेंट देणार असल्याचे सांगितले आहे












Leave a Reply