ऐरोली विधानसभा मतदारसंघातील आदिवासीबहुल अडवली-भुतावली गावामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला आहे. आदिवासी बांधवांसाठी जीवनदायिनी ठरू शकणाऱ्या १५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या कामास नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. माजी खासदार संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाची सुरुवात झाली. यावेळी माजी नगरसेवक रमेश डोळे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.सुमारे पाच कोटी रुपये खर्चून उभी राहणारी ही पाण्याची टाकी, परिसरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी या भागातील लोकांसाठी पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचा जो शब्द दिला होता, त्याची पूर्तता या कामातून होत आहे. पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण झाल्यानंतर, या १५ लाख लिटर क्षमतेमुळे परिसराला पुढील पंचवीस वर्षांसाठी पाण्याची कोणतीही अडचण राहणार नाही आणि पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात होईल.
याप्रसंगी बोलताना माजी खासदार संजीव नाईक यांनी सांगितले कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक गावात जलपूर्तीचा संकल्प आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदिवासी पाड्यांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबवण्यावर भर, याच दिशेने अडवली-भुतावली येथील हा प्रकल्प एक महत्त्वाचे पाऊल आहे
















Leave a Reply