Navi Mumbai | नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये 93 संघांचा उत्फुर्त उत्साही सहभाग

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय “टेबल टेनिस” क्रीडा स्पर्धांचे आयोजन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात आले असून या स्पर्धा 04 सप्टेंबर रोजी फादर ॲग्नल, स्पोर्टस सेंटर, सेक्टर-10, वाशी येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या.

            या स्पर्धेत 14, 17 आणि 19 वर्षाआतील विविध  शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतून मुलांच्या गटात 64 संघांनी आणि मुलींच्या गटात 29 संघांनी अशा एकूण 93 संघांनी उत्फुर्तपणे सहभागी होत हा स्पर्धा उपक्रम यशस्वी केला. विशेष म्हणजे नवी मुंबई शहरातून आता टेबल टेनिस या खेळातही शाळांचा सहभाग वाढत असल्याचे समाधानकारक चित्र पुढे आले असून टेबल टेनिस मध्येही गुणवंत खेळाडू उदयास येत असल्याचे दिसून येत आहे.

            या स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलांच्या गटात पहिली उपांत्य फेरी फा.ॲग्नल स्कूल वाशी आणि व्ही.पी.एम. स्कूल ऐरोली यांच्यात झाली. त्यामध्ये फा.ॲग्नल स्कूल, वाशी शाळेच्या संघाने 3:0 अशा सरळ तीन सेट मध्ये सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

         दुसरी उपांत्य फेरी  दिल्ली पब्लिक स्कूल नेरुळ आणि ए.पी.जे. स्कूल नेरुळ यांच्यात झाला. या अत्यंत चुरशीच्या लढतीत दिल्ली पब्लिक शाळेच्या संघांने 3:2 अशा सेटने सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

            या गटातील अंतिम सामना फा.ॲग्नल स्कूल वाशी आणि दिल्ली पब्लिक स्कूल नेरुळ यांच्यात झाला. या अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात  फा.ॲग्नल स्कूल वाशी  शाळेच्या संघाने 3:2 अशा सेटने विजयश्री संपादन करीत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.

          या गटातील तिस-या क्रमांकासाठी ए.पी.जे.स्कूल नेरुळ आणि व्ही.पी.एम. स्कूल ऐरोली यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात 3:0 अशा सेटने ए.पी.जे.स्कुल नेरुळ शाळेच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावला.

          स्पर्धेतील 17 वर्षांखालील मुलांच्या गटात पहिली उपांत्य फेरी न्यू होरायझन स्कॉलर स्कूल ऐरोली आणि दिल्ली पब्लिक स्कूल नेरुळ यांच्यात होऊन त्यामध्ये दिल्ली पब्लिक स्कूल नेरुळ शाळेच्या संघाने 3:1 अशा तीन सेटमध्ये सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

         दुसरी उपांत्य फेरी फा.ॲग्नल स्कूल वाशी आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल (ICSC) नेरुळ यामध्ये होऊन त्यामध्ये फा.ॲग्नल स्कूल वाशी शाळेच्या संघाने 3:0 अशा सरळ सेटने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

          या गटातील अंतिम सामना फा.ॲग्नल स्कूल वाशी आणि दिल्ली पब्लिक स्कूल नेरुळ यांच्यात झाला.  या अंतिम सामन्यामध्ये फा.ॲग्नल स्कूल वाशी शाळेच्या संघाने 3:0 अशा सरळ सेटने सामना जिंकत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता संपादन केली.

         या गटातील तिस-या क्रमांकासाठी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल (ICSC) नेरुळ आणि न्यू होरायझन स्कॉलर स्कूल ऐरोली यामध्ये झालेल्या सामन्यात 3:1 अशा सेटने सामना जिंकत पोद्दार इंटरनॅशनल स्कुल(ICSC) नेरुळ शाळेने तिसरा क्रमांक पटकावला.

            या स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलांच्या गटात पहिली उपांत्य फेरी रायन इंटरनॅशनल स्कूल सानपाडा आणि शिरवणे विद्यालय इंग्रजी माध्यम नेरुळ यांच्यात होऊन या चुरशीच्या सामन्यात रायन इंटरनॅशनल स्कूल सानपाडा शाळेच्या संघाने 3:1 अशा सेटमध्ये सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

         दुसरी उपांत्य फेरी डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल ऐरोली आणि दिल्ली पब्लिक स्कुल नेरुळ यांच्यात होऊन दिल्ली पब्लिक स्कूल नेरुळ शाळेच्या संघाने 3:0 अशा सरळ सेटने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

            या गटातील अंतिम सामना दिल्ली पब्लिक स्कूल नेरुळ आणि रायन इंटरनॅशनल स्कूल सानपाडा यांच्यात होऊन या चुरशीच्या अंतिम सामन्यात फा.ॲग्नल स्कूल वाशी शाळेच्या संघाने 3:0 अशा सेटने सामना जिंकून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता संपादन केली.

    या गटातील तिस-या क्रमांकासाठी डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल ऐरोली आणि शिरवणे विद्यालय इंग्रजी माध्यम स्कूल नेरुळ यामध्ये सामना होऊन 3.0 अशा सेटने जिंकत डी.ए.व्ही.पब्लिक स्कूल ऐरोली शाळेचा संघ तिस-या क्रमांकांची मानकरी ठरला.

            या स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलींच्या गटात पहिली उपांत्य फेरी अमेटी इंटरनॅशनल स्कूल सीबीडी बेलापूर आणि डॉ.डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूल  नेरुळ यांच्यात अत्यंत चुरशीची होऊन अमेटी इंटरनॅशनल स्कूल सीबीडी बेलापूर शाळेचा संघ 3:0 अशा सेटमध्ये जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करता झाला.

         दुसरी उपांत्य फेरी फा.ॲग्नल स्कूल वाशी आणि माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा यांच्यात होऊन फा.ॲग्नल स्कूल वाशी शाळेच्या संघाने 3:0 अशा सरळ सेटने लढत जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

            या गटातील अंतिम सामना फा. ॲग्नल स्कूल वाशी आणि अमेटी इंटरनॅशनल स्कूल सीबीडी बेलापूर यांच्यात होऊन अंतिम सामन्यात फा. ॲग्नल स्कूल वाशी शाळेच्या संघाने 3:0 अशा सेटने सामना जिंकत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.

            या गटातील तिस-या क्रमांकासाठी डॉ.डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूल नेरुळ आणि माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात 3:0 अशा सेटने सामना जिंकत डॉ.डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूल नेरुळ शाळेच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

            या स्पर्धेतील 17 वर्षांखालील मुलींच्या गटात पहिली उपांत्य फेरी फा.ॲग्नल स्कूल,वाशी आणि रायन इंटरनॅशनल स्कूल सानपाडा यांच्यात होऊन यात फा.ॲग्नल‌ स्कूल वाशी शाळेच्या संघाने 3:0 अशा सरळ तीन सेटमध्ये सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

         दुसरी उपांत्य फेरी रिलायन्स फाउंडेशन स्कूल कोपरखैरणे आणि अमेटी इंटरनॅशनल स्कूल सीबीडी बेलापूर यांच्यात  होऊन या चुरशीच्या लढतीमध्ये अमेटी इंटरनॅशनल स्कूल सीबीडी बेलापूर शाळेच्या संघाने 3:0 अशा सेटने लढत जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

            या गटातील अंतिम सामना फा.ॲग्नल स्कूल वाशी आणि अमेटी इंटरनॅशनल स्कूल सीबीडी बेलापूर यांच्यात होऊन अंतिम सामन्यात फा.ॲग्नल स्कूल वाशी शाळेचा संघ 3:0 अशा सरळ सेटने सामना जिंकत विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.

            या गटातील तिस-या क्रमांकासाठी रायन इंटरनॅशनल स्कूल सानपाडा  आणि रिलायन्स फाउंडेशन स्कूल कोपरखैरणे यामध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात 3:0 अशा सेटने सामना जिंकत रायन इंटरनॅशनल स्कूल, सानपाडा शाळेच्या संघाने तिसरा क्रमांक पटकाविला.

            या स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलींच्या गटात पहिली उपांत्य फेरी दिल्ली पब्लिक स्कूल नेरूळ आणि रिलायन्स फाउंडेशन स्कूल कोपरखैरणे यांच्यात होऊन दिल्ली पब्लिक स्कूल नेरूळ शाळेच्या संघाने 3:0 अशा सरळ सेटमध्ये सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

            दुसरी उपांत्य फेरी डॉ. डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल नेरूळ आणि ए.पी.जे. स्कूल नेरूळ यांच्यात होऊन डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल नेरुळ शाळेच्या संघाने 3:2 अशा सेटने लढत जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

            या गटातील अंतिम सामना दिल्ली पब्लिक स्कूल नेरुळ आणि डॉ.डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल नेरूळ यांच्यात होऊन या अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात दिल्ली पब्लिक स्कूल नेरुळ शाळेच्या संघाने 3:1 अशा सेटने सामना जिंकत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.

            या गटातील तिस-या क्रमांकासाठी  ए.पी.जे. स्कूल नेरुळ आणि रिलायन्स फाऊंडेशन स्कूल कोपरखैरणे यामध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात 3.2 अशा सेटने सामना जिंकत ए.पी.जे. स्कूल, नेरुळ शाळेच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावला.

            यावर्षीच्या स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडूंच्या खेळात दर्जात्मक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या स्पर्धेचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाकडून करण्यात येऊन स्पर्धा यशस्वीरित्या आयोजनाकरिता प्रमुख पंच श्री. गौरव फणसाळकर व श्री.सुहास चव्हाण यांचे विशेष सहयोग लाभले. या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या संघांना पुढील मुंबई विभागीय स्पर्धेसाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *