जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकावले असून, या विश्वविजेत्या खेळाडूंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या यशामुळे भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले असून तिरंग्याचा सन्मान अधिक उंचावला आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, खेळाडूंना सरावादरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आर्थिक सहाय्य, रोजगाराच्या संधी आणि आवश्यक सुविधा राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच सरावासाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी मैदान आणि पायाभूत सुविधा देण्याबाबत क्रीडा आयुक्तांमार्फत योग्य कार्यवाही केली जाईल.
कोणतीही आर्थिक किंवा कौटुंबिक अडचण खेळातील प्रगतीस अडथळा ठरू नये, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात संघाच्या कर्णधार दीपिका टी.सी., उपकर्णधार व महाराष्ट्राची खेळाडू गंगा कदम, तसेच क्रीडा विभाग आणि क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड इन इंडिया चे पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.















Leave a Reply