मुंबई, ३० जुलै:
राज्यातील शालेय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण आणि अनुभवाधारित व्हावे, यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘खान अकॅडमी’ आणि ‘श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ या संस्थांशी दोन स्वतंत्र सामंजस्य करार (MoU) केले आहेत. या करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या.
🔹 करारांचे मुख्य वैशिष्ट्ये:
- खान अकॅडमीच्या सहकार्याने 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अभ्यास प्रकल्प’ राबवला जाणार आहे.
- या उपक्रमांतर्गत मराठी आणि इंग्रजी भाषेत व्हिडिओ तसेच अभ्याससामग्री उपलब्ध करून दिली जाणार असून विद्यार्थी आपल्या गतीने शिकू शकतील.
- SCERT या राज्यस्तरीय संस्थेमार्फत प्रकल्पाची अंमलबजावणी होणार असून तीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
- श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने राज्यातील निवडक १५० शाळांमध्ये आधुनिक अनुभवाधारित शिक्षण पद्धती विकसित केली जाणार आहे.
- शाळांची पूर्वतपासणी, शाळा विकास आराखडा आणि शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण यावर विशेष भर दिला जाईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमांचे स्वागत करत सांगितले की, “हे उपक्रम केवळ शिक्षण पद्धतीत नवचैतन्य आणणार नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि शिकण्याची जिज्ञासा देखील वाढवतील.”
हे दोन्ही करार राज्यातील शालेय शिक्षणात सकारात्मक बदल घडवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.













Leave a Reply