आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईचे राजकारण चांगलेच तापले आहे. याच रणधुमाळीत भाजप नेते व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत विरोधकांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. शहरातील काही राजकीय घडामोडी आणि वाढत्या आरोपांना प्रत्युत्तर देताना गणेश नाईक यांनी आक्रमक हल्लाबोल करत आरोप केला की, “नवी मुंबईचे वैरी बाहेरचे आहेत.” गणेश नाईक यांनी अप्रत्यक्षपणे बाहेरील राजकीय शक्तींकडून शहरात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.
गणेश नाईक यांनी, सध्या त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना “चोरांच्या उलट्या बोंबा” असे संबोधत विरोधकांना फटकारले.











Leave a Reply