नाशिक येथे वन्यजीव रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान बिबट्याच्या हल्ल्याला धैर्याने सामोरे जाताना जखमी झालेले वनविभागाचे शूर वनरक्षक रांजय गोलाईत आणि संतोष बोडके यांची भेट घेण्यासाठी राज्याचे वनमंत्री मा. गणेशजी नाईक यांनी श्री गुरुजी रुग्णालयास भेट दिली.
या भेटीदरम्यान मा. नाईक यांनी दोन्ही जखमी वनरक्षकांची प्रकृती अत्यंत आस्थेने जाणून घेतली. त्यांच्या उपचारांबाबत डॉक्टरांकडून सविस्तर माहिती घेत त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांचा धीर वाढवला. जखमी वनरक्षकांनी दाखवलेल्या धैर्याची आणि कर्तव्यपरायणतेची त्यांनी प्रशंसा केली.
या प्रसंगी वनविभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. राज्यातील वनरक्षकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासनही वनमंत्री नाईक यांनी यावेळी दिले.












Leave a Reply