महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या पार पडलेल्या वाढदिवस सत्कार समारंभात, पत्रकारांना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी सरकारकडे पेन्शन योजनेचा आग्रह धरण्याची घोषणा संघाच्या वतीने करण्यात आली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासोबतच समर्थ गावकरी वृत्तपत्राचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर, तसेच दैनिक समर्थ गावकरी वृत्तपत्राचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. विश्वासराव आरोटे यांनी, पत्रकारांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. दशरथ चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी ‘पेन्शन योजना’ लागू करण्याच्या मागणीसाठी ‘एल्गार’ केला. “पत्रकारांना त्यांच्या उतारवयात आर्थिक आधार देण्यासाठी पेन्शन योजना अत्यंत गरजेची आहे,” असे ठाम मत व्यक्त करत डॉ. आरोटे म्हणाले की, “या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा संघाच्या माध्यमातून सरकारकडे ही पेन्शन योजना सुरू करण्याबाबतची मागणी जोरदारपणे लावून धरली जाईल.” पत्रकारांना सुरक्षित आणि सन्मानाचे भविष्य मिळावे यासाठी ही मागणी निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नेहमीच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी व पत्रकारांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी संघ पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.












Leave a Reply